
Interstate Extortion Racket Targeting Women Sarpanches Busted! Taking immediate cognisance of complaints from women Sarpanches being threatened with extortion in the name of advertisements, CM Devendra Fadnavis directed the police to take swift action, leading to the busting of an interstate extortion racket. During his stay at Lohari Sawanga, Narkhed Taluka, Nagpur District to celebrate Diwali with drought effected farmers CM Devendra Fadnavis interacted with local leaders, the women sarpanches from the area, a complaint was raised with CM Devendra Fadnavis regarding threatening phone calls made in the name of ‘Shresth News’. Acting promptly on his directions, the Nagpur Rural Police, Crime Branch and Cyber Police conducted a swift investigation, uncovered 3 illegal call centres in Bhopal and arrested 4 women accused in the case. महिला सरपंचांना जाहिरातीच्या नावाखाली खंडणीसाठी धमकावणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत कारवाईचे निर्देश दिल्याने सरपंचांना धमकावणाऱ्या आंतरराज्यीय खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे मुक्कामी राहून शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींशी साधलेल्या संवादादरम्यान तेथील महिला सरपंचांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ‘श्रेष्ठ न्यूज़’च्या नावाने येणाऱ्या धमकीच्या फोनबाबत तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, नागपूर ग्रामीण पोलीस, क्राइम ब्रँच व सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत भोपाळमधील 3 बेकायदेशीर कॉल सेंटर्सचा पर्दाफाश केला आणि या प्रकरणातील 4 मुख्य महिला आरोपींना अटक केली. @Dev_Fadnavis @SPNagpurrural @MahaCyber1 #Maharashtra #DevendraFadnavis #WomenSafety




















