
भाजपा परिवाराचा संघटनात्मक विस्तार अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व मंत्री व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील जी, मा. श्री. गिरीश महाजन जी, मा. श्री. आशिष शेलार जी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘सेवादूत अभियान’ प्रभावीपणे राबविणे, तसेच जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ पोहोचविण्यासोबतच भाजपा परिवाराची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटनात्मक पातळीवर समर्पित भावनेने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. @RaviDadaChavan @cbawankule @ChDadaPatil @girishdmahajan @ShelarAshish #SevaSankalp #BjpMumbai #BJP #BJPParivar #MPLodha











