←
Maha Forest Official4,432 posts
Maha Forest Official avatar

Maha Forest Official

@MahaForest

This is the official X handle of Maharashtra Forest Department. Call 1926 - 'Hello Forest' toll free helpline.

◷ Joined October 2015▧ 2,544 Photos and videos
CMO Maharashtra avatar
⟳ Maha Forest Official retweeted
CMO Maharashtra@CMOMaharashtra·Nov 17

🔸 CM Devendra Fadnavis chaired a meeting regarding various issues of the Forest Department. Minister Ganesh Naik, MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक. यावेळी मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में वन विभाग के विभिन्न प्रश्नों के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕑 1.50pm | 17-11-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.५० वा. | १७-११-२०२६📍मंत्रालय, मुंबई. @Dev_Fadnavis @NaikSpeaks @Ashishjaisw3Adv #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

Post attachmentPost attachmentPost attachment
0:13
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 12

निसर्गातील प्रेम, निष्ठा आणि सहजीवनाचे प्रतीक — सारस क्रौंच विदर्भातील पाणथळ जागा, लांब पाय, व तांबड्या रंगाची मान व डोके असणारा हा पक्षी ताडोबा परिसरातील जैवविविधतेतही अत्यंत महत्त्वाचा आहे. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #सारसक्रौंच #पक्षीसंवर्धन

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 11

आकाशातील दुर्मीळ सम्राट — राजगिधाड काळसर शरीर, लाल रंगाचे उघडे डोके व मान आणि मजबूत चोच असलेला हा अत्यंत मोठा आणि शक्तिशाली पक्षी विदर्भ आणि मध्य भारतातील जंगलात व खुल्या प्रदेशात आढळतो. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #राजगिधाड #पक्षीसंवर्धन

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 10

पांढऱ्या पाठीचे गिधाड विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर जंगलांमध्ये आढळणारे हे गिधाड मृत प्राण्यांचे मांस खाऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करते. यांच्या कार्यामुळे मृत जनावरांमधून पसरणाऱ्या रोगांचा धोका टळतो. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 9

नदीच्या वाळूवर घरटे करणारा आकर्षक पक्षी — पाणाचिरी मोठ्या नद्या व वाळूच्या पट्ट्यांवर आढळणारा हा काळा-पांढरा आकर्षक पक्षी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #पाणाचिरी #पक्षीसंवर्धन #IndianSkimmer #MahaForest

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 8

गवताळ प्रदेशातील निसर्गाचा नर्तक — तणमोर सोलापूर व दख्खनच्या पठारी भागात आढळणारा हा जगातील सर्वात आकर्षक प्रणयप्रदर्शन करणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. 🗓️ पक्षी सप्ताह: ५-१२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #तणमोर #LesserFlorican #BirdWeek

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 8

शंभर वर्षांनंतर पुन्हा सापडलेला मध्य भारतातील स्थानिक प्रजाती असलेला — रानपिंगळा तब्बल ११३ वर्षे नामशेष मानला गेलेला हा दुर्मिळ घुबडवर्गीय पक्षी १९९७ मध्ये पुन्हा शोध लागल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जंगले व मेळघातात आढळतो. पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 6

गवताळ प्रदेशाचा दुर्मिळ सम्राट — माळढोक लांब पाय, मजबूत शरीर आणि डोक्यावर काळा मुकुट असलेला हा देखणा पक्षी आपल्या गवताळ प्रदेशाचा गौरव आहे. सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांतील माळराने हा या दुर्मिळ पक्ष्याचा ऐतिहासिक अधिवास आहे. 🗓️ पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 5

वसुबारस ऐवजी साजरी होते 'वाघबारस', दिवाळीतील परंपरा, निसर्ग आणि वन्यजीवांच्या सहअस्तित्वाचा अनोखा उत्सव. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील ही अनोखी परंपरा निसर्ग, पशुधन आणि वन्यजीवांमधील सलोख्याचे सहअस्तित्व सुंदर पद्धतीने दर्शवते. #वाघबारस #वसुबारस #वन्यजीवसंरक्षण

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 5

हिरव्या वनराईचा हिरवा मानकरी — महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्ष्यांसाठी नैसर्गिक अधिवास व खाद्यस्रोत जतन करण्याचा आणि स्थानिक फळझाडांचे संवर्धन करण्याचा दृढ संकल्प करूया पक्षी सप्ताह: ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर #पक्षीसप्ताह #हरियाल

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Nov 4

वनातील अमूल्य ठेवा — आवळा (Phyllanthus emblica) वनातील अमूल्य ठेवा मानवी आरोग्यासोबतच माती संवर्धन व कार्बन शोषणात महत्त्वाची भूमिका बजावतो. जंगलांमधील गुणकारी वृक्ष आपल्या निसर्गाचा आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा आधार आहे. #MahaForest #Amla #TreePlantation #Ayurveda #SaveNature

Post attachment
MAHARASHTRA DGIPR avatar
⟳ Maha Forest Official retweeted
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·Oct 30

कोल्हापूर वन विभागाने गेल्या वीस दिवसांत लोकसहभागातून वनक्षेत्रात ४५० वनराई बंधारे उभारले असून, त्यामुळे सुमारे तीन कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. एक हजार बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंवर्धनाचे विविध उपाय करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या उपक्रमाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती तसेच वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभाच्या दिवशी करण्यात आली. या अभियानातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश पोहोचवण्यात आला. या अभियानात ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लोकसहभाग आणि श्रमदानाच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. वनक्षेत्रात वनराई बंधारे बांधल्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होते. परिणामी, भूजल पातळी वाढण्यास तसेच परिसरातील विहिरी आणि इतर जलस्रोतांमधील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास हातभार लागतो. तसेच, पाण्याचा प्रवाह नियंत्रित होऊन मातीची धूप कमी करण्यास आणि मृदसंधारणाचे कार्य साध्य करण्यास मदत होते. जंगलामध्ये वन्यप्राण्यांसाठी पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज जंगलातच भागविण्यास मदत होते, असे श्री. पाटील यांनी सांगितले. #वनराईबंधारे #वनविभाग

Post attachmentPost attachmentPost attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Oct 28

सामाजिक जबाबदारी फंडातून सहकार्यातून निसर्ग संवर्धनाचे कार्य महाराष्ट्रात होत आहे. वनविभागाने विकास व पर्यावरण समतोल एकाच वेळी साध्य करत वनक्षेत्र वाढण्याबरोबरच विकासात्मक कामांनाही गती दिली आहे. #महाराष्ट्र #निसर्ग #संवर्धन #वनविभाग #विकास #पर्यावरण #समतोल #वनक्षेत्र

3:51
MAHARASHTRA DGIPR avatar
⟳ Maha Forest Official retweeted
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·Oct 27

कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र व नवीन विस्तारित तानसा वन्यजीव राखीव क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून मान्यता १४ संवर्धन राखीव क्षेत्रांनाही मान्यता #वनक्षेत्र #MahaDGIPR

Post attachment
Maha Forest Official avatar
Maha Forest Official@MahaForest·Oct 27

वन विभागामार्फत तालुक्यातील तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण शेतात अथवा घर अंगणात आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नका. बिबट्यापासून सावध रहा, मानव बिबट संघर्ष कमी करूया. "सावध रहा - सुरक्षित रहा." #Forest #वनविभाग #बिबट्या #सावधान

0:52