Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

भवानी पेठेतील ऐतिहासिक लाकूड बाजारातील आगग्रस्त भागाची मा. पुणे महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आश्वासन भवानी पेठ व गंज पेठ परिसरातील ऐतिहासिक लाकूड बाजारात काल लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आज घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्त परिसराची सविस्तर पाहणी केली. या आगीमध्ये सुमारे ७० ते ८० दुकानांचे नुकसान झाले असून, यावेळी त्यांनी आगीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेमुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांच्या व्यवसायावर आणि उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच या कठीण प्रसंगी महापालिका प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही देत व्यापाऱ्यांना धीर दिला. आगीमुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून पंचनामे व आवश्यक अहवाल तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत व भरपाई लवकरात लवकर मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याशिवाय, लाकूड बाजारातील सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे, भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी करणे आणि नुकसानग्रस्त व्यवसाय पूर्ववत सुरू होण्यासाठी आवश्यक सहकार्य करणे यावरही त्यांनी भर दिला. पुणे महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसह व्यापारी बांधवांच्या हिताला प्राधान्य देत असून, या दुर्घटनेतून बाधित झालेल्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #TimberMarket #VijayVallabhSchool #FireIncident #FireSafety #PuneFireBrigade

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते श्री. जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे वृक्षारोपण
सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते श्री. जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे वृक्षारोपण आज बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते श्री. जॅकी श्रॉफ यांच्या शुभहस्ते पुणे येथील जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर परिसरातील छत्रपती संभाजीराजे उद्यान येथे वृक्षारोपणाचा अनौपचारिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी श्री. जॅकी श्रॉफ यांनी स्वतः वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. पुणे शहरातील वाढते तापमान, वाढते वायुप्रदूषण आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अपरिहार्य कारणास्तव वृक्षतोड करावी लागल्यास त्याबदल्यात जास्तीत जास्त नवीन वृक्षांची लागवड करून त्यांचे योग्य संगोपन करणे आवश्यक आहे. आपल्या भावी पिढीचे, विशेषतः लहान मुलांचे भविष्य सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. सह महापालिका आयुक्त तथा उद्यान विभागप्रमुख डॉ. श्री. अशोक दि. घोरपडे, श्री माधव जगताप, उपायुक्त तसेच उद्यान विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हरित, स्वच्छ व प्रदूषणमुक्त पुणे शहराच्या निर्मितीसाठी पुणे महानगरपालिकेचा उद्यान विभाग वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #JackieShroff #TreePlantation #ChhatrapatiSambhajiRajeUdyan #GreenPune #HaritPune #PuneMunicipalCorporation #PMC #TreeConservation #EnvironmentalProtection #SaveTrees #GoGreen #CleanAndGreenPune #SustainablePune #पर्यावरणसंवर्धन #वृक्षारोपण #वृक्षसंवर्धन #हरितपुणे #स्वच्छपुणे #पुणेमहानगरपालिका @majhivasundhara @bindasbhidu

नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर पुणे महानगरपालिकेची दंडात्मक कारवाई! पुणे महानगरपालिकेच्या विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयामार्फत दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी नदीपात्रात राडारोडा टाकल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच संबंधित व्यक्तीकडून नदीपात्रातील संपूर्ण राडारोडा हटवून घेण्यात आला. नदीपात्र व सार्वजनिक ठिकाणी राडारोडा किंवा कचरा टाकू नये. शहराचे पर्यावरण आणि स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCPune #PuneMunicipalCorporation #CleanPune #SwachhPune #Pune

शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेची कारवाई! पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत आज शहरातील विविध भागांत अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनधिकृत बांधकामे, व्यावसायिक स्टॉल, हातगाड्या तसेच सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. संबंधित ठिकाणांवरील अनधिकृत साहित्य जप्त करून सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यात आल्या. शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत नियमितपणे कारवाई करण्यात येत आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PMCPune #PuneMunicipalCorporation #EncroachmentRemoval #Pune #अतिक्रमणमुक्तपुणे

जागतिक AMR जनजागृती सप्ताह २०२६ १८ ते २४ नोव्हेंबर २०२६ नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WorldAMRWeek #WAAW2026 #AMRAwareness #AntimicrobialResistance #PreventAMRNow #OneHealthOneAction #OneHealth #AntibioticResistance #AntibioticAwareness #ResponsibleAntibioticUse #PublicHealth #HealthAwareness @MoHFW_INDIA

समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत २५ लाखांची आर्थिक मदत पुणे महानगरपालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर सन २०१६ पासून समूह वैयक्तिक अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कामगार कल्याण विभागामार्फत आजअखेर २७ सेवकांना/वारसांना एकूण रु. ३,०५,८५,०००/- इतकी आर्थिक मदत अदा करण्यात आली आहे. परवाना व आकाशचिन्ह विभागातील शिपाई सेवक कै. कुंडलिक बबन वेडे यांचा दि. २२/११/२०२५ रोजी अपघात झाला होता. त्यानंतर दि. १/४/२०२६ रोजी त्यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वारस पत्नी मा. श्रीमती प्रमिला कुंडलिक वेडे यांना बुधवार, दि. १८/११/२०२६ रोजी रु. २५ लाखांचा धनादेश मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री. प्रजित नायर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभागाचे मा. खातेप्रमुख तथा मा. मुख्य कामगार अधिकारी श्री. नितीन केंजळे उपस्थित होते. या आर्थिक मदतीबद्दल संबंधित सेवकाच्या वारसांनी पुणे महानगरपालिकेचे आभार मानले. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #GroupPersonalAccidentInsurance #AccidentInsuranceScheme #FinancialAssistance #EmployeeWelfare #LabourWelfare #EmployeeBenefits #SocialSecurity #PrajitNair @LabourMinistry

जागतिक सीओपीडी दिन फुफ्फुसांच्या दीर्घकालीन अडथळाजन्य आजाराबाबत (Chronic Obstructive Pulmonary Disease – COPD) जनजागृती करण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी जागतिक सीओपीडी दिन साजरा केला जातो. या आजारामुळे श्वसनमार्ग अरुंद होतात आणि रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. सततचा खोकला, कफ आणि धाप लागणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. धूम्रपान, वायुप्रदूषण आणि हानिकारक धूर किंवा धुळीच्या संपर्कामुळे या आजाराचा धोका वाढू शकतो. लवकर निदान, योग्य वैद्यकीय उपचार, धूम्रपानापासून दूर राहणे आणि प्रदूषण नियंत्रण यांद्वारे आजाराचे व्यवस्थापन करणे शक्य आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WorldCOPDDay #COPDAwareness #COPD #ChronicObstructivePulmonaryDisease #LungHealth #RespiratoryHealth #HealthyLungs #BreatheEasy #StopSmoking #AirPollution #HealthAwareness #EarlyDiagnosis #PreventiveHealthcare @MoHFW_INDIA

थोरले माधवराव पेशवे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #ThorleMadhavraoPeshwa #MadhavraoPeshwa #PeshwaHistory #MarathaHistory #MarathaEmpire #IndianHistory #HistoricalTribute #DeathAnniversary

माजी महापौर बाबुराव सणस यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #BaburaoSanas #FormerMayor #Tribute #DeathAnniversary #FloralTribute @MDNagpure